जुन्या काळातील गमतीशीर आणि शिकण्या सारख खूप काही एक किस्सा!!
खूप वर्ष्या पूर्वीची हि गोष्ट आहे आणि सत्य घटनेवर आधारित असून, या गोष्टी मधून आपणास खूप काही शिकण्या सारखा आहे. पूर्वी आपणास ठाऊक असेलच खूप लांब ने प्रवास करायचं असेल तर ST बस किंवा ट्रेन. बस चा प्रवास हा फक्त गाव पासून ते मार्केट किंवा मेन रेल्वे स्टेशन. या गोष्टी मध्ये मी कोणाचा नाव किंवा वैयक्तिक अशी माहिती दिली नसून फक्त पात्र म्हणून विशेष अशे नाव दिले असून त्या नुसार हि गोष्ट पाहणार आहोत.
एका शेतकऱ्याची हि गोष्ट आहे. त्या शेतकऱ्याला शेती कामासाठी ट्रॅक्टर ची गरज पडते तर तो ट्रक घेण्यासाठी गावावरून मुंबईला निघतो. ज्यावेळी नवीन ट्रॅक्टर फक्त मुंबईतच मिळत असे अन् मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय पर्याय नव्हता.
अशा काळात दोन शेतकरी नगदी रक्कम घेऊन ट्रॅक्टर आणण्यासाठी मुंबईला निघाले. रेल्वेस्टेशनवर जाऊन तिकीट काढून रेल्वेत बसले आणि रात्री आठच्या सुमारास मुंबईत पोहोचले,
स्टेशनवर उतरले,
मुंबई मध्ये कोणी हि ओळखीचा नसल्याने राहायचे कुठे हा प्रश्न त्या दोन्ही शेतकऱ्यांना पडला आणि सोबत खूप मोठी रक्कम सुद्धा होती. काय करावं समजेना, कावरे-बावरे होऊन इकडे तिकडे बघत होते.
त्या काली चोऱ्या खूप व्हायच्या, आणि आता हि होतात त्यात विशेष असं नाही.
दुकाने सकाळी दहा वाजता उघडणार, रात्री पैसे घेऊन कोठे झोपायचे ? आता काय करावं हा विचार मनात करत होते. असा विचार करता करता ते बाहेर पडण्यासाठी गेटजवळ आल्यावर एकाने
आपल्या जोडीदाराला सांगितले की तू गप्प बस.
कांही बोलू नकोस. आणि गेटजवळच्या टी.सी. जवळ जाऊन घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. टी.सी.ने त्याला विचारले,
“ए तिकीट दिखाव !
त्याचा तो करारी आवाज ऐकून दोघेही गर्भगळीत झाले –
(तेंव्हा गावी राहणाऱ्या माणसांना हिंदी सुद्धा बोलता येथ नसे) आणि म्हणाले
“नय साब तिकीट पड्या हाय !”
त्यावर टी.सी. म्हणतो – झूठ बोलता है टिकिट नही निकाला, विदाऊट टिकिट आया और बोलता है टिकिट पड्या !
चल अंदर चल जेलमे बैठ, अभी रात के बारा बजे है, सुबह कल केस दर्ज होगा. अश्या प्रकारे टी.सी.
त्या दोघांना घेऊन जातो. जोडीदार घाबरला, पहिला त्याला म्हणाला उगं गुमान बस काईच बोलू नगस. टी.सी.ने त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी त्यांना कोठडीत नेऊन बसवलं.
खायला नियमाप्रमाणे राईसप्लेट आणून दिले आणि दोघं तट्टाड झोपले. सकाळी उठून तोंड धुवून चहा पिला. दहा वाजता बरोबर टि.सी. आला आणि म्हणाला चलो !
“शेतकरी म्हणाला कुठं नेताव आमाला ?”
चलो विदाऊट तिकीट सफर करना गुनाह है, अब तुमारे पे केस दर्ज होगा.
त्या दोघांना घेऊन टि.सी. साहेबानकडे केस नोंदणी करण्या साठी घेऊन निघाला.
टि.सी. पुढं आणि हे दोघं त्याच्या मागं! गेटजवळ आले.
टी.सी गुश्श्यात चालत होता.
तेवढ्यात एक शेतकरी म्हणाला
“अवो सायब जरा थांबा की”
शेतकऱ्याने येताना काढलेली दोन तिकिटे आपल्या खिश्यातुन हळूच काढून त्याला शेतकऱ्यानं दाखवली. तिकीटं निरखून टी.सी. पाहू लागला आणि म्हणाला
रात को क्यों नही दिखाया?
शेतकऱ्याने जरा हि नं घाबरता आपली बाजू प्रामाणिकपणे त्या टी.सी. ला सांगितली शेतकरी म्हणाला
“साब हामारे पास इतने सारे रूपय है, हम यहाँ नये आये हैं| कुछ भी मालूम नही | रात को कहां जाएंगे? चोरो का डर| इसीलिए हमने सोचा यही सोएंगे| ऐसे तुम सोने नही देते, ईसलिए हमने दिमाग चलाया.
टि.सी.ने कपाळाला हात मारून घेतला.
“बाबारे तुम हमारे गुरू बन जाव, हम कुछ तुमसे सीखेंगे.”
शेतकरी म्हणाला धन्यवाद साहेब रातभर हमारे लिये खडा पहारा दिया और खाने को भी दिया,
सुबह सुबह चा्य पिलायी| इतना सारा तो
हॉटेल वाले भी नही करते |
टी.सी. म्हणाला जा बाबा जा अब और दिमाग मत खा |
मोठ्यानं हसत दोघं शेतकरी स्टेशन बाहेर पडले.
सांगायचं तात्पर्य एवढच कि शेतकऱ्यांना अडाणी अन् कमी समजायचं नाही,
आपल्या शेतकऱ्याचा नाद करायचा नाय ! ! !
सगळ्यांचा पोशिंदा आहे, परंतु परिस्थितीने पिचलेला आहे. याची जाणीव सर्वानी ठेवावी.
शेतकऱ्यांचा आदर करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. त्यांच्या कडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
जर तुम्ही कधी प्रेमाने शेतकऱ्यासोबत बसून गप्पा मारत बसलात तर तुम्हाला त्यांच्या पूर्ण आयुश्याचा अनुभव तो माणूस निस्वार्थी पणे सांगतो.
निष्कर्ष (Conclusion)
वसाहती आधुनिकतेच्या परिस्थितीत भारतातील ऐतिहासिक चेतना आणि इतिहासलेखन अभ्यासामध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले. या कामाचा एक मध्यवर्ती उद्देश हा आहे की या परिवर्तनाची विशिष्ट वैशिष्ट्ये रेखाटणे, आणि ही वैशिष्ट्ये त्याच्या पश्चिम भारतीय, मराठी भाषेतील आधुनिकतेचा विशिष्ट अनुभव कशा प्रकारे प्रकाशित करू शकतात याचा शोध घेणे. मी अठराव्या शतकातील पूर्व-औपनिवेशिक इतिहास-लेखन अधिवेशनांपासून एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील आधुनिक इतिहासलेखनापर्यंतच्या बदलांचा मागोवा घेतला आहे आणि या शतकांमध्ये भूतकाळाची निर्मिती आणि पुनरुत्पादित होत असलेल्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक संदर्भांची ओळख करून दिली आहे.आरोग्य विषयक माहिती तसेच नवीन नवीन आयडिया संकल्पना तुम्हाला याची माहिती देण्यात मला खूप आनंद होत आहे. जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुढे सुरू ठेवण्यासाठी या IMP History वर क्लिक करा.
ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.
हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता