नेताजी पालकर (Netaji Palkar) यांची संपूर्ण माहिती

नेताजी पालकर (Netaji Palkar) यांची संपूर्ण माहिती

 

 

नेतोजी पालकर   हे दीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते.

त्यांनाप्रतिशिवाजीम्हणजेचदुसरा शिवाजीअसेही म्हटले जायचे. नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर चे परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला.त्यांनी अनेक युद्धे गाजवली. त्यांनी महाराजांच्या पदरी राहून अनेक लढायात पराक्रम करून, महाराजांचे लक्ष वेधून घेतले. ते एकेक पायरी चढत स्वराज्याचे दुसरे सरनौबत झाले.पुरंदर पहिल्यांदा स्वराज्यात आल्यानंतर त्यांना पुरंदरचे सरनौबत करण्यात आले. अफजल खानाच्या वधाच्या वेळी, अफजल खानाच्या सैन्याची दाणादाण उडवण्यात यांचा सिंहाचा वाटा होताअफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलाकडे पाठविले, त्यांनी आदीलशहावर आक्रमन केले. मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले. नेतोजींना अरबस्तानात पाठविले.तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते. त्यांनी मुघलांची चाकरी केली, पण नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला, त्यांच्या मुलाचा जानोजीचा स्वतःच्या मुलीशी विवाह करून दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.

 

पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेतोजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेतोजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारेसमयास कैसा पावला नाहीसअसे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्ऱ्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेतोजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.

अटक

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्ग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेतोजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्ऱ्याला पाठवायची व्यवस्था केली. दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेतोजी मुस्लिम झाले त्यांचेमुहम्मद कुलीखानअसे नामकरण करण्यात आले (जून १६६७). औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबालाप्रतिशिवाजीचीआठवण झाली. मग त्याने यामुहम्मद कुलीखानास‘, दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.

महाराज आग्रा
भेटीत
 गेल्यावर नेताजींना मोगलानी आपल्याकडे वळवले
 महाराजांची व नेताजी पालकरांची काहीही करून  भेट होणार नाही याची पूर्ण
काळजी
 घेतली. तेव्हा धारूर येथील छावणीत त्यांना अटक करून दिल्लीस रवाना करण्यात आलेत्या
वेळी
 चारदिवसाच्या अमानुष छळानंतर त्यांनी धर्मांतरास मान्यता दिली. 27 मार्च1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे मुहम्मद कुलीखान असे नामकरण करण्यात आले. तेथून त्यांना
काबुल
कंधार च्या मोहिमेवर पाठवण्यात आले, लाहोर येथून पळण्याच्या त्यांनी प्रयत्न केला पण तो फसलापुढे
नऊ
 वर्ष ते काबुल कंदाहारच्या मोहिमेवर
लढत
 होते तिथे त्यांनी मोठा पराक्रम गाजवला.हिकडे
शिवाजी
 महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, तेव्हा प्रतिशिवाजी अशी ख्याती असलेल्या नेताजी पालकर उर्फ मुहमद कुली खान यांना औरंगजेबाने महाराष्ट्रात महाराजांवर पाठवले, पण पश्चात्ताप झालेले नेताजी पुन्हा महाराजांना येऊन मिळाले.

  

हिंदू धर्मात प्रवेश

मे १६७६. रोजी पश्चात्ताप झालेले नेतोजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. महाराज नेतोजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई यांचे नेतोजींशी काय नाते होते हे फार मोठे प्रश्नचिन्ह अजूनही आहे. ‘छावानुसार नेतोजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते. [स्रोतवरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखकबाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखकशिवाजी सावंत) या दोन ग्रंथांमधून घेतलेली आहे.]

नेतोजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे आहे.

 


 

 

मृत्यु

 महाराजांच्या राणीसाहेब पुतळाबाई यांच्यातील नातं म्हणजे ते त्यांचे काकात्यांनी पुढे फार वर्षे एक दिलाने स्वराज्याची सेवा केली.महाराजांबद्दल व  त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या नात फार प्रेम व आपुलकी ची भावना होती,
म्हणूनच
 ते
मोगलांकडे
 फार काळ टिकले नाहीतते पराक्रमी व शूर व निष्ठावान होते,
त्यांच्या
 पराक्रमामुळे त्यांची प्रतिशिवाजी अशी ओळख होतीते मूळचे कोकणातील खालापूर येथील कायस्थ प्रभू,
त्यांचे
 वडील
आदिलशाहीच्या
 चाकरीत होतेतेथून ते शिरूर येथे स्थायिक झालेआणि येथूनच त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला.
त्यांच्या
 पराकोटीच्या निष्ठेमुळेमहाराजानी समाजाचा विरोध डावलून त्यांना पुन्हा हिंदू  धर्मात विधीवत
सामील
 करून घेतले
 

हीच खरी महाराजांची दूरदृष्टी,
आपल्या हिऱ्याने परक्याच्या शिरपेचात राहून प्रकाश देण्यापेक्षाआपल्या पदरी राहिल्यास तो आपलाच फायदा” हेच महाराजांचे धोरण अशी कितीतरी माणसं महाराजांनी स्वराज्यास जोडली व त्याच माणसांनी स्वराज्यासाठी प्रसंगी आपले प्राणपणाला लावले,त्यापैकीच एक नेताजी पालकर त्यांचा मृत्यु 1681 मध्ये झाला.थोर धर्माभिमानीस्वराज्यरक्षक सेनानीला हे स्वराज्य कायमच मुकल.

 

 

नेताजी पालकर यांच्याविषयी लिहिली गेलेली मराठी

 पुस्तके/चित्रपट

नेताजी पालकर (चित्रपट, १९७८, दिग्दर्शक कमलाकर तोरणे)

अग्निदिव्य (कल्याणीरमण बेन्नुरवार)

 नेताजी पालकर : स्वराज्याच्या पहिल्या घनघोर संग्रामात, मिचेल मॅकमिलन यांनी पाहिलेले (लेखकमायकेल मॅकमिलन, मराठी अनुवादपंढरीनाथ सावंत)

 शिवबाचा शिलेदार (कादंबरी, .ना. जोशी)

 

निष्कर्ष

अश्या प्रकारे आम्हाला जी काही सर्व माहीती तुमच्या समोर उपलबध करता आली आणि अजून काही माहिती मिळाली तर ती हि उपलब्ध करू. हि सर्व माहिती हि खरी असून काल्पनिक आहे.
 
आमचा लेख कसा वाटला हे comment द्वारे नक्की कळवा.

Daily Visitors
0

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Get Updates And Stay Connected -Subscribe To Our Newsletter



Category



FOLLOW US

Scroll to Top