Kondaji Farjand कोंडाजी फर्जंद

Kondaji Farjand कोंडाजी फर्जंद

 अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा शिवरायांचा निडर शिलेदार कोंडाजी फर्जंद

 
        आपल्या प्राणांची पर्वा करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात
उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली.

त्याच पराक्रम शिलेदारांपैकी एक होते कोंडाजी फर्जंद!

अवघ्या ६० मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा स्वराज्याला समर्पित केला.

 

|| ‘शिवबाने शर्थ केली |’शंभूने प्राण लावला ||

 || या मुघलांमुळे, सिद्ध्या |तुझा, ‘जंजिराअजिंक्य राहिला ||


किल्ले जंजिरा हा एक अभेद्य आणि अंजिक्य किल्ला आहे. जो आजवर कुणालाही जिंकेणे शक्य झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही. संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत
रस्ता तयार करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश आले नाही.

बुऱ्हा खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष. जंजिऱ्याचे सिद्धी मुळचे अबिसीनियाचे शूर आणि काटक होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला. अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न अयशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवणे शक्य झाले नाही. १६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे 1947 पर्यंत त्याच्याच पिढ्या येथे राज्य करत होत्या. देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

 

अश्या या शूर योध्याविषयी आणि त्याच्या पराक्रमाविषयी माहिती करून देणारा हा लेख!

 

 घोडेस्वार दौडत किल्ल्यावर आला, आलेला स्वार पायउतार होऊन राजांना मुजरा करुन म्हणाला, राजे साल्हेरच्या
किल्ल्यावर फत्ते झाली, पण सूर्यराव पडले.

राजे आनंदी झाले तेवढेच दु:खी पण झाले. साल्हेर किल्ला मिळाल्याचा आनंद होता तर पुन्हा एक मावळा गमावल्याचे दुःख होते.

पण स्वराज्य आणायचं तर असे बलिदान होतातच म्हणून राजांनी तोफखान्याला वर्दी दिली, किल्ल्यावर साखर वाटली आनंद केला.

राजे पुढच्या मोहिमा ठरवायला बसले होते, सोबत अनाजी दत्तो, मोत्याजी खेळकर, कोंडाजी फर्जंद सगळेच होते. राजे बोलू लागले.

अनेक दुर्ग मुलुख परत स्वराज्याला मिळाले पण एक सल अजून मनात तशीच आहे, अगदी आजही!

सर्वांनी राजांकडे प्रश्नार्थी नजरेने बघितले, पण अमात्य बोलले,

राजे, पन्हाळ्याबद्दल
बोलतायं! हो ना ?

राजे सुद्धाहोम्हणाले, पण लगेच पुढचा प्रश्न टाकला,

कोण पन्हाळा घेईल ?

सर्वांनी एकसोबतच आवाज दिला,

मी!

राजे म्हणाले,

कोंडाजी, जाशील तू पन्हाळा घ्यायला ?

कोंडाजी मुजरा करूनहोम्हणाले! मागील अनेक दिवस दक्षिणेचा दरवाजा असणारा हा पन्हाळगड आदिलशहाच्या
ताब्यात होता. मागे एकदा हल्ला करूनही जिंकता आल नव्हत युद्ध सोडून पळावे लागले होते. तो पन्हाळा घ्यायला कोंडाजी निघाला.

मोहिमेसाठी २०० तरी याने मागणं अपेक्षित होतं. पण मराठे जातीचेच निधड्या छातीचे! किती सैन्य मागावं याने?

कोंडाजी फर्जंद नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं :

राजे, ३०० गडी द्या फक्त

राजे अचंबित झाले!

कोंडाजी फक्त ३००? पुरतील ?

कोंडाजी म्हणला,

राजे, ६० पुरेत, पण अगदीच मोजके नको म्हणून ३०० सांगितले.

कोंडाजीने मुजरा केला पाचाडला पागा तयार होती तिकडं जायला निघाला, राजांनी त्याला वापस बोलावले, तो लगेच वळला,

जी राजे! बोलावलत ?

राजांनी आपलं कडं काढून कोंडाजीला दिलं, कोंडाजी खुश झाला. येसाजी म्हणला

राजे, मोहिमेच्या आधी इनाम ?

राजे शांत झाले कोंडाजीला आज्ञा दिली. अवघे ३०० स्वार घेऊन स्वारी राजापूरला गेली किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली.

किल्ल्याचे पहारे, किल्ल्याच्या कमजोर बाजू, कुठं कुठं तोफा आहेत? किल्लेदार कुठं असतो? पहारे कुठं कमी आहेत? आणि नेमकी माहिती कळली,

गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथं तटबंदी विरळ आहे पहारे सुद्धा कमी असतात.

आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले, ठरलं तर ! इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गुन कृ त्रयोदशी शके १५९५, मार्च, १६७३!

 

 

कोंडाजी ३०० जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या
जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपला. अनाजी दत्तो यांना सांगितलं,

पंत आपण हितच थांबा, मी ६० जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो, गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या.

पंत २४० स्वार घेऊन तिथंच थांबले, कोंडाजी निघाला. त्यानं सैन्यासोबत अनेक कर्णे दिले होते. तो नियोजनाचा भाग होता. गडाखाली गेले, दोर लाऊन सपसप कडा चढून गेले.

अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये, अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले.

पूर्वेला किल्लेदाराच्या
महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते.

इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरु झाले. घोषणा, आरडाओरडासगळ्यांनी एकदाच आवाज धरला. किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला.

निळोजी सबनीस म्हणून किल्ल्यावर होता. त्याला वाटलं इतके कर्णे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे. तो ओरडत पळू लागला.

सोबत अनेकांना सांगू लागलासैन्य खूप आहेजीव वाचवापळागनीम संख्येने फार आहे.”

हे ऐकून अजून ४००५०० लोक पळू लागले, येवढं वजा जाता देखील किल्ल्यावर १२०० माणसं बाकी होती. ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते, मराठे सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते.

आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या. म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता. नेमका कोंडाजीसमोर आला, कोंडाजीचा एक घाव मानेवर लागला आणि मुंडक उडालं.

किल्लेदार पडला?!!! सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी
बातमी गेली की किल्लेदार पडला.

 

मग काय? सगळे सैन्य कच खाऊन पळू लागले. बघता बघता किल्ला घेतला गेला. पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती, तो किल्ला अवघ्या ६० जणांनी घेतला.

गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले, तोफांना बत्त्या दिल्या. त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या. एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला.

तो किल्ल्यावर गेला तो दिवस चैत्र शु प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा! राजांना बातमी कळली आणि मग काय विचारता, राजे भारावून बोलू लागले,

तोफा द्या, साखर वाटा, सरनोबत आपल्या हुजुरातीची तयारी करा! आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे!

 

राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी बाकी साथीदारांचे सत्कार कौतुक केले !

कोंडाजी आणि त्यांच्या ६० सहकाऱ्यांना मानाचा मुजरा ! जय शिवराय
!!

जंजिरा मोहीम

कोंडाजी फर्जंदने तो संभाजीशी फितूर झाल्याचे नाटक केले. तो जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण तो हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह तो पकडला गेला. त्याचा गळा चिरून त्याला मारले गेले.

 ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.

जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.

त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.

याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला.संभाजी राजांनी कोंडोजीच्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेऊन निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धीला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धीला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येऊन मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धीची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजीच्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजीचे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.

संभाजी महाराजांनी कोंडाजीला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.

दिवस ठरला, सुरूंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेऊन उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे काही समान बरोबर घेऊन येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धीच्या दरबारा कडे गेली. सिद्धीला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.

पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनाऱ्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजीचा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजीचे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेऊन राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.

मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरू झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरू होताच.

पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेऊन कल्याणभिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येवू लागला होता

त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले.

आता खूप लोक तसेच व्हिसिटर मुरुड जंजिरा किल्ला पाहण्या साठी या किल्ल्यावर भेट देत असतात. त्या मदे काही टिपलेला छायाचित्रे मी सादर केले आहेत. अलिबाग मडे मुरुड किल्ला तस्सेच खूप काही पाहण्या सारख आहे. 

 एक विडिओ share केली आहे. विडिओ पाहण्या साठी कृपया खाली लिंक वर click करा. 
👇🏻
 
 

जमलंच तर नक्की भेट द्या…. 

 

 

निष्कर्ष
अश्या प्रकारे आम्हाला जी काही सर्व माहीती तुमच्या समोर उपलबध करता आली आणि अजून काही माहिती मिळाली तर ती हि उपलब्ध करू. हि सर्व माहिती हि खरी असून काल्पनिक आहे. 
 
 आमचा लेख कसा वाटला हे comment द्वारे नक्की कळवा
 
Daily Visitors
0

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Get Updates And Stay Connected -Subscribe To Our Newsletter



Category



FOLLOW US

Scroll to Top